Hollywood Bollywood : RRR ठरला जगात भारी; वाचा नेमकं काय घडलं?

 


ब्युरो टीम: राजमौली यांचा RRR जगात भारी सिनेमा ठरलाय. नुकतीच हॉलिवूड क्रिटिक असोसिएशन अवॉर्ड्स ची घोषणा झाली. हा पुरस्कार सोहळा जगातला मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो. या पुरस्कार सोहळ्यात RRR ने विविध पुरस्कार सोहळ्यात स्वतःचं नाव कोरलं आहे. RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. RRR चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. याशिवाय RRR नाटू नाटू गाण्यासाठी बेस्ट सॉंग आणि बेस्टस्टंट असा पुरस्कार मिळाला आहे.

 Jr NTR आणि राम चरण यांच्या अभिनयाने सजलेला RRR हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्याआधी RRR ला हा मोठा सन्मान मिळाला आहे. RRR च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. RRR निमित्ताने भारतीय सिनेमांचा डंका हॉलिवूडमध्ये गाजतोय

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने