ब्युरो टीम: भारतातीळ पेक्षकांना अजूनही हॉलिवूडची क्रेझ आहे. अशातच हॉलिवूड स्टार्ससोबतच बॉलीवूड स्टार्सही त्याच्यासोबत हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. काम करण्याची संधी काही मोजक्याच बॉलीवूड स्टार्सना मिळत असली, तरी ज्याला ती मिळाली, त्यांनी ही संधी सोडली नाही.लिओनार्डो डी कॅप्रियो हा हॉलिवूडचा सुपरस्टार असल्यावर तर नाहीच नाही. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी लिओनार्डो डी कॅप्रियो आणि रसेल क्रो यांचा चित्रपट करण्यास नकार दिला होता. होय, याचा खुलासा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केला आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने एक धक्कादायक खुलासा केला आहे. खरे तर हॉलिवूडचे दिग्दर्शक रिडले स्कॉट यांना नाना पाटेकर यांना त्यांच्या बॉडी ऑफ लाईज या चित्रपटात कास्ट करायचे होते, परंतु त्यांनी दहशतवादाची भूमिका करायची नाही असे सांगून ही ऑफर नाकारली.
जेव्हा अनुराग कश्यपला विचारण्यात आले की त्याने नाना पाटेकरसोबत काम का केले नाही? यावर तो म्हणतो की, 'दोघांनी अनेकदा एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली आहे. अनुरागने सांगितले की, निर्माता ख्रिस स्मिथला 'द पूल' चित्रपटातील एका व्यक्तिरेखेसाठी नानासारख्या व्यक्तीची गरज होती. यासाठी त्यांनी अनुरागकडे मदतीसाठी धाव घेतली'.
ख्रिस स्मिथने यांनी वर्णन केलेल्या भूमिकेसाठी नाना पाटेकर एकदम अनुकूल होते. त्यानंतर अनुराग स्वतः या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन नानांकडे गेला होता. नानांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटातील नानांचे काम पाहून ऑस्कर विजेते रिडले स्कॉटही प्रभावित झाले होते. अनुराग म्हणाला, "रिडले स्कॉटने द पूल पाहिला आणि मला एक ईमेल पाठवला. त्याला नाना पाटेकरला बॉडी ऑफ लाईजमध्ये मार्क स्ट्राँगच्या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते".
." बॉडी ऑफ लाईज हा २००८ चा स्पाय थ्रिलर सिनेमा आहे ज्यात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो मुख्य भूमिकेत आहेत". या चित्रपटासाठी मी नानाकडे गेलो तेव्हा त्यांना म्हंटले की रिडले स्कॉटला तुम्हाला चित्रपटात घ्यायचे आहे. पण "दहशतवादाची भूमिका आहे, लगेच नानांनी काहींही विचार न करता लगेच नाही म्हणून टाकले.
टिप्पणी पोस्ट करा