Job :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ



ब्युरो टीम : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन देण्यात येणार आहे

आजच महासंघाने परिपत्रक काढत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सेवेतील १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. वेतन श्रेणीतील तफावतीनंतर एक समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या  वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग दाखल करण्यात आला होता. मात्र त्यात त्रुटी होत्या, त्या त्रुटी शासन निर्णयामध्ये दुर करण्यात आल्या आहेत. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने