K Chandrashekhar Rao : मी आलोय, बीआरएस पक्षाची महाराष्ट्रात एंट्री



ब्युरो टीम : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली आहे. राव यांनी आज नांदेड येथे जाहीर सभा घेतली. विशेष म्हणजे या पहिल्याच जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. जाहीर सभेत बोलताना  राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकावर तोफ डागली.

'स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही लोकांना ना पिण्यासाठी पाणी मिळत आहे, ना सिंचनासाठी. इतकी सरकारे आली आणि गेली त्यांनी काय केले? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे राव म्हणाले. 'महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचे खुप दु:ख वाटते, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना राव म्हणाले, 'अब की बार किसान सरकार' येणार आहे. आता आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जायचे आहे. देशात मोठ्या बदलाची गरज आहे. बरेच लोक येतात, लांबलचक भाषणे देऊन निघून जातात. मात्र ७५ वर्षांनंतरही देशाला पाणी, वीज मिळत नाही. ही खरी शोकांतीका आहे,' असेही ते म्हणाले.


दरम्यान,  के. चंद्रशेखर राव यांनी आज प्रथमच  तेलंगणा राज्याबाहेर जाहीर सभेला संबोधित केले. भारत राष्ट्र समिती या नवीन पक्षाची अध्यक्ष म्हणून स्थापना केल्यानंतर, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड शहरात जाहीर सभा घेण्याचे ठरवले. या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने