Kaneri math :पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दाद



ब्युरो टीम : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या 'काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून पंचमहाभूत बोध' या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. - दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या या प्रयोगाचे (कलाकृती) मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्व, त्यांच्यावर होत असलेले परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश 'पंचमहाभूत बोध' प्रयोगातून देण्यात आला. यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी 'पंचमहाभूत संरक्षणाची शपथ' उपस्थितांना दिली.

स्क्रीन, लेझर शो, नृत्य, नाट्य व स्पेशल इफेक्ट (अग्नी, वारा, पाऊस)चा वापर करुन तयार करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच संदेशपर प्रयोग असल्याची माहिती निर्माते - दिग्दर्शक श्री. माने यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने