Kasaba By Election : 'कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?' पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बॅनर्स चर्चेत!



ब्युरो टीम : 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???…' समाज कुठवर सहन करणार?” असा  बॅनर पुण्यात झळकला असून त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात लागलेले बॅनर्स नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बॅनर्सवर लिहिणाऱ्याचं नाव ‘कसब्यातील एक जागरूक मतदार’ असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी हे बॅनर्स आणि त्यावर मांडण्यात आलेला मुद्दा यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुण्यातील कसबा आणि चिंचवड या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याविरोधात स्थानिक ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. पुण्यातील बॅनर्स वरून हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या बॅनर्स मधून कोथरूड निवडणुकीचा संदर्भ देण्यात आला आहे.पुण्यात कोथरूडमध्ये स्थानिक उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत पाटील निवडून आले असले, तरी मेधा कुलकर्णींचं १ लाखांचं मताधिक्य पाटलांसाठी २० हजारांवर आल्याचं दिसून आलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने