kasaba bypoll election :कॉँग्रेसचे उमेदवाराला आंदोलन भोवणार? वाचा नेमका प्रकार काय



ब्यूरो टीम: कसबा आणि चिंचवड मतदारसंघात उद्या (२६ फेब्रुवारी) पोटनिवडणूक पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपाने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटप केले, असा आरोप धंगेकरांनी केला. याचा निषेध म्हणून रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण सुरू केलं. यानंतर पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं आहे.

भाजपावर पैसे वाटल्याचा आरोप आणि रवींद्र धंगेकरांच्या उपोषणानंतर कसबा पोटनिवडणुकीने नवीन वळण घेतलं आहे. कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय घेणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने