kasaba election; पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी ! मनसे कसबा पोटनिवडणुकीसाठी इच्छुक? राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

  


ब्युरो टीम: पुण्यात कसाब पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर  झाली असून मनसेनेही या निवडणुकीत उतरण्याचे ठरवले असून त्यासाठी उद्या पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहे. 

      राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर पुण्यातील विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड या  दोन रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकी साठी सर्वच पक्षांनी  तयारी चालवली आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि  महाविकस आघाडीने आपले उमेदवार निश्चित केले आहेत.  तर याच निवडणुकीत मनसेने देखील आपला उमेदवार देण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर कसबा पेठ मतदार संघात मनसेचा उमेदवार कोण याची चर्चा शहरात रंगली आहे.  राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

     मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर असून  सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच शहर कार्यकारणी यांनी तयार केलेली इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासतील. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकता, असा विश्वास राज ठाकरे यांनी दर्शवला आहे.

      पुण्यातून कसबा पोटनिवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची यादी शहर कार्यकारिणीने राज ठाकरे याना काही नावे पाठवली आहेत. यात गणेश भोकरे ,अजय शिंदे, आशिष देवधर, पळद गवळी, बाळा शेडगे, गणेश सातपुते हे नेते पोटनिवडणुकीसाठी इच्छुक म्ह्णून पुढे आली आहेत. यापैकी एकाच्या नावावर राज ठाकरे शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने