kasaba peth: कसब्यात निकालाआधीच लागले विजयाचे फ्लेक्स; उत्साही कार्यकर्त्यांचा



 ब्युरो टीम: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या कसबा पे मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक आणि स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड या मतदारसंघात होत असलेली पोटनिवडणूक. अशा या दोन्ही मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार आणि आमदार म्हणून विधानभवनात कोण जाणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.

पण एकीकडे निकालाची ही धाकधुक असताना पुन्हा एका पुणेकरांनी पुणे तिथे काय उणे या उक्तीचा परिचय आख्ख्या राज्याला करुन दिलाय. प्रचारावेळी उडालेला सभा, रॅलींचा धुरळा आणि मतदानाच्या दिवशी झालेले राडे, आरोप-प्रत्यारोप, गुन्हे दाखल हे सर्व एका बाजूला सारत पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागात चक्क एका उमेदवाराचा आमदार पदी निवड झाल्याचा बॅनर लागल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रविंद्र धंगेकर बनले कसब्याचे आमदार!

उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच फ्लेक्स लावण्यास सुरुवात केली आहे. पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागातील हा फ्लेक्स आहे. खरंतर मतमोजणीसाठी अद्याप आजचा आख्खा दिवस शिल्लक आहे. असे असताना 1 मार्च म्हणजे मतमोजणीच्या दोन दिवस आधीच रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे म्हणजेच मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे आमदार म्हणून निवडून आल्याचे लिहून त्यांना शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे. आता हा विश्वास खरा ठरणार की खोटा हे 1 मार्चलाच समजेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने