ब्युरो टीम: कसबा विधानसभा पोटनिवडणूक ही 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीचा
निकाल आता उद्या म्हणजेच दोन मार्चला लागणार आहे. दरम्यान या मतमोजणीला उद्या
सकाळी दहा वाजता सुरुवात होणारा असून ही मतमोजणी कोरेगाव पार्कमधील अन्न धान्य
गोदामात होणार आहे.
त्याचबरोबर सेंट मीरा
कॉलेज ते आतुर पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी
गल्ली क्रमांक एक मधून प्रवेश दिला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी या वाहतूक
व्यवस्थेतील बदलाबाबत नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर दरोडे पथ मार्गावर वाहने देखील
पार्क करता येणार नाहीत.
उद्याच्या निकालाकडे
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला
लागलेलं गालबोट या निकालाच्या दृष्टीने आता अधिक गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळेच पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे.
अनेक नाट्यमय घडामोडी
झाल्यानंतर आणि या जागेसाठी दोन्हीही प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते आणि खुद्द
मुख्यमंत्री देखील प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळेच या निकालाकडे आता
संपूर्ण महाराष्ट्राचा देखील लक्ष लागला आहे. या मतमोजणी दरम्यान केंद्राबाहेर
पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा