Kasba By- Election : पोटनिवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला धक्का; नाना पटोलेच्या भूमिकेमुळे पुण्यातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?



ब्युरो टीम: विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी इतर पक्ष आणि भाजप वारंवार बैठका घेताना दिसून येत आहेत. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पक्नेषाचा पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात जाण्याच्या  तयारीत  आहे  यामुळे पक्षाला मोठा धक्का बसणार असून मागील आठवड्यात सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपाच्या पार्शभूमीवर  काँग्रेस प्रदेश्ध्याक्षाच्या  नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

रविवारी प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नगरसेवक रशीद खान यांनी भाजपमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रशीद शेख यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांचा त्रीव्र विरोध होता मात्र त्यांच्या नकळत या सर्व  सर्व घडामोडी झाल्याने माजी नगरसेवक अविनाश बागवे भाजपा प्रवेशाची चर्चा पुणे शहारत रंगली आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रशीद खान यांचा मतदार संघात मुस्लीम समाजावर असलेल्या प्रभावामुळे बागवेंचा  विधानसभेच्या निवडणुकीत साडेचार हजार मतांनी झालेला पराभव बगवेंच्या जिव्हारी लागल्याने त्यांचा या प्रवेशास विरोध होता. त्यामुळे बागवे यांना आधी कसलीच कल्पना न देता थेट काँग्रेस भवनात पटोले यांच्या उपस्थितीत शेख यांना प्रवेश देण्यात आला.

ज्या रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. यामुळे  काँग्बारेसचे तीन टर्म नगरसेवक असलेले माजी मंत्री रमेश बागवे व त्यांचे  चिरंजीव अविनाश बागवे  शेख यांच्या प्रवेशाने  बागवे पिता-पुत्र नाराज झाल्याचे समजताच भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला.

 शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री भोजनासाठी नाना पटोले व अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याठिकाणी रमेश बागवे यांना देखील बोलविण्यात आले होते. मात्र त्यांनी त्ण्यायांना प्चेरतिसाद दिला नसलायची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे बागवे भाजपच्या वाटेवर जाण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने