kasba chinchwad : कसबा, चिंचवड निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने लावला जोर, स्टार प्रचारकांची यादी जाहीर


ब्युरो टीम :
कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका सध्या रंगतदार अवस्थेत पोहचल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघात सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली आहे.  २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत असून या दोन्ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसतेय. त्यातच आता या मतदार संघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील , चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुनिल केदार, आ. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. सतेज पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, खा. इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने