Kasba Election: कसबा पेठ निवडणूक बिनविरोध करण्यसाठी भाजप उमेदवार घेणार मागे ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मताशी सहमत : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे



ब्युरो टीम: पुण्यातील कसबा  पेठ आणि चिचंवड येथील निवडणूक जाहीर झाली असून भाजप दोन्ही जागा लढवत असून महाविकास आघाडीत कसबाची जागा काँग्रेस तर चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा मतदार संघातील उमेदवार मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीला एक आवाहन केले आहे. 

या निवडणुकीत  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप  यांना संधी देण्यात आली आहे. तर कसबा पेठमधून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या ऐवजी हेमंत रासणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून कसब्यात रवींद्र धंगेकर याना उमेदवारी देण्यात आली आहे.  याच जागेवर भाजपकडून शैलेश टिळक  हे देखील इच्छुक होते. त्यामुळे कसबा पेठ या मतदार संघात भाजपने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात असतांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक  यांच्या उमेदवारीवरुन मोठं भाष्य केलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये एक न्याय अन कसबा पेठेत वेगळा न्याय अशी चर्चा पुण्यात चर्च सुरु झाल्याने भाजपवर उमेदवार बदल्यांची वेळ आली आहे अशी चर्चा पुणे शहरात सुरु आहे. सद्या पुण्यात आधी कुलकर्णी, नंतर टिळक आणि पुढील नंबर बापटांचा का ? असा मजकूर असलेले  बॅनर झळकत आहेत यामुळे पुण्यात ब्राम्हण समाजावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. असे बॅनर पुण्यात झळकू लागल्याने भाजपमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही  प्रयत्नशील आहेत. त्यातच नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावत  पिंपरीत जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली पण कसबा पेठमध्ये टिळक यांच्या घरात का उमेदवारी दिली नाही असा सवाल करत कॉंग्रेस निवडणूक लढणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने