Kasba Peth : जनमत कुणाकडे? कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरू



ब्युरो टीम : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  मतदान सुरू आहे. दोन्ही मतदारसंघांत चुरशीची लढत होण्याच्या शक्यतेने प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतलीय.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात   एकूण दोन लाख ७५ हजार ६७९ मतदार असून, २७० मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये एकूण पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० केंद्रांवर मतदान होत आहे.

दरम्यान, कसबा मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे धंगेकर यांच्यात चुरस आहे. चिंचवड मतदार संघामध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या तिरंगी लढत आहे. मात्र आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात पुणेकर मतदानाला बाहेर पडलेले दिसले. दुपारी बारा नंतर मात्र मतदारांची गर्दी होऊ लागलीय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने