MNS : औरंगजेबाला शेवटाची अंघोळ घातलेला चौथरा हटवा, मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ


ब्युरो टीम :  अहमदनगर शहराजवळील आलमगीर या गावात मुगल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला शेवटची अंघोळ तेथे घालण्यात आली, व त्याच्या शरीराचे काही भाग त्या ठिकाणी पुरण्यात आले, व त्याचा चौथारा त्या ठिकाणी बांधण्यात आला आहे. जो चौथारा आहे, हा नगर शहराच्या जवळील भिंगार येथील आलमगीर या गावात आहे.  पण अशा आठवणी अहमदनगर शहराजवळ व जिल्ह्यात कुठेही असता कामा नये, अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे. त्यामुळे शेवटाची अंघोळ घातलेलेला  चौथारा या नगर शहराजवळील आलमगीर या गावात आहे, व तो ताबडतोब हटवावा, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून केली आहे.

आपण जर हा चौथारा लवकरात लवकर हटवला नाही, तर भविष्यात मतांच्या राजकारणासाठी त्याचे स्मुती स्थळ होयला वेळ लागणार नाही. ज्या प्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जो काही औरंगजेबाचा पुळका आलेला आहे, त्यामुळे भविष्यात मतांच्या राजकारणासाठी मतांच्या बेरजेसाठी जितेंद्र आव्हाडां सारखे काही औरंगजेब प्रेमी हे त्याच चौथाऱ्याचे सुशोभीकरनाची मागणी करतील. त्यामुळे अशा औरंगजेबाची चौथरा हा ताबडतोब काढावा.  औरंगजेबाची कुठल्याही प्रकारची आठवण स्मुर्ती स्थळ ही आमच्या नगर शहराच्या जवळ नगर जिल्ह्यात नको आहे. ही आमची मागणी आहे. ज्या औरंगजेबाने हिंदू धर्माची मंदिरे पाडली, असा क्रूरकर्मा औरंगजेब त्याची आठवण भविष्यात इतिहासात नगरच्या नावाने नोंद नको. त्यामुळे ही जी काही चौथरा आहे, तो आपण ताबडतोब हटवावा. जेणेकरून सर्व शिवप्रेमींना  समाधान होईल. त्यामुळे आपण या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, व ताबडतोब यावर कारवाई करावी, अशी विनंती मी आपणास करत आहे. अन्यथा भविष्यात आम्हाला हा चौथारा हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, याची सुद्धा आपण दखल घ्यावी, असा इशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने