MNS: मनसेचं इंजीन त्याच ट्रॅकवर धावलं. मनसेने दिला भाजपाला पाठिंबा



ब्युरो टीम : पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोरव आलीय पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मनसे कसबा आचि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचं स्पष्ट झालंय. मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झालीय. मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिलीय.

भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आहे. वरिष्ठ स्तरावर बोलणं झालंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भाजप नेते आज मनसेच्या नेत्यांच्या भेटीला गेले.

पुण्यातील भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि माधूरीताई मिसाळ यांनी मनसे नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या भेटीनंतरच पुण्यात पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आलीय.

भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील गेल्या काही दिवसांमधील जवळीक वाढली आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतल्याच्या बातम्या याआधीच समोर आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आल्याचे बघायला मिळाले होते.

दुसरीकडे गेल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना युतीसाठी खुली ऑफरही दिलीय. त्यामुळे पुण्यात भाजप आणि मनसे एकत्र येईल, असं अनेकांना वाटत होतं. अखेर पुण्यात तसाच निर्णय झाल्याची माहिती समोर येतेय.

चिंचवडमध्ये ‘वंचित’च्या पाठिंब्यासाठी रस्सीखेच

दुसरीकडे चिंचवड विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झालीय. महाविकास आघाडीचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनीही वंचितला तसा प्रस्ताव पाठवला आहे

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे या दोघांनीही तशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणाला पाठिंबा देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने