MPSC: अधिकारी व्हायचंय हे ठीक आहे पण ..., शरद पवार म्हणाले



 ब्युरो टीम: एमपीएससी परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने मान्य केल्या. सहा महिने चाललेल्या या लढा यशस्वी झाला झाल्यानंतर परीक्षार्थींच्या आंदोलन स्थळी रात्री ११ वाजता भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणारे शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थ्यी भेटीला आले होते.

त्यावेळी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. "आमच्या मागण्यांना, आंदोलनाला आपण पाठिंबा दिलात. आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिलात., याबद्दल आपले आभार मानण्यासाठी आम्ही आज तुमच्या भेटीला आलोय", असं परीक्षार्थींनी पवार यांना सांगितलं. पवारांनीही मुलांची आस्थेने विचारपूस करत त्यांच्याकडून भविष्याचा 'मार्ग' जाणून घेतला.

यावेळी पवारांनी प्रत्येक विद्यार्थ्याला नाव-गाव विचारत पुण्यात कधीपासून अभ्यास करताय? आई वडील काय करतात? असे प्रश्न विचारले. नंतर भविष्यातील त्यांचे 'मार्ग' विचारताना अधिकारी व्हायचंय हे ठीक आहे.. पण स्वत:चं काही निर्माण करावसं वाटलं नाही का? किंवा वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. यावर विद्यार्थी निरुत्तर झाले. काही सेकंद हॉलमध्ये सन्नाटा पसरला. विद्यार्थ्यांकडे उत्तर नसल्याचं पाहून पवार इतर प्रश्नांकडे वळले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने