ब्युरो टीम: आम्हला नावे ठेवण्या अगोदर तुमचे हात स्वच्छ आहेत का ? अशा प्रश्न उपस्थित करत तुमचेच हात मुबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत. असे विधान आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे याना उद्देशून केले आहे.
"मी उद्धवजींना नम्रपणे विनंती करीन. आदित्यजींच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका. आमच्यावर दगड मारायचा विचार कराल तर शंभर बोटं तुमच्याकडे येणार आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
कमला मिल कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधलेल्या हुक्का पार्लर आणि बारमध्ये २०१७ रोजी आग लागून १४ मुंबईकरांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता.पण आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर २०२० मध्ये हा गुन्हा मागे घ्यायला लावला आणि मालकाला मोकळं केलं असं शेलार म्हणाले.
पावसाच्या पाण्यात चालत जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झालेले "जगविख्यात डॉक्टर अमरापूरकर हे मनपाच्या भोंगळ कारभाराचे उदाहरण आहे. याच वरळीच्या बीडीडी चाळीमधील चार महिन्याच्या चिमुरड्याला नायर रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले नाही. बाळ रडून रडून मृत्यूमुखी पडलं. आदित्य ठाकरे त्यांना बघायलाही गेले नाहीत", असं शेलार म्हणाले.
मुबईकरांच्या भावना समजून घेणारे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे आज कोळीवाड्यातील प्रश्न सुटले आहेत. मुबईकरांनी आशीर्वाद दिले तर पाच वर्षात मुंबईचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही अशी मी सरकारच्या अवंतीने ग्वाही देतो असे शेलार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा