Mumbai Police Alert: मुंबई पोलीस सतर्क; पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 'या' गोष्टींवर घालणार बंदी



ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. त्यसाठी खबरदारी म्हणून  मुंबई पोलिसांनी  मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला असून मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.

 लवकरच मुंबईहून दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, एक वंदे भारत ट्रेन मुंबई-शिर्डी मार्गावर  तर, दुसरी  मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार आहे. याचे उद्घाटन  पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने