Name Change : केंद्र सरकारच ठरलं! आता औरंगाबाद नव्हे आता छत्रपती संभाजीनगर



ब्युरो टीम : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचं नामांतरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने  मंजुरी दिलीय. त्यामुळे आता औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची  बैठक झाली होती. या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता. शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर औरंगाबाद शहराचे नामांतर गेल्या २५ वर्षांत तिसऱ्यांदा झाले होते. पण प्रत्यक्षात शहराचे नाव कधी बदलणार याची सर्वांना प्रतीक्षा होती.

अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने