ncp : माजी आमदाराचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा; राष्ट्रवादीला धक्का बसणार!



ब्युरो टीम: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत.त्यातच  राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे यांनी मात्र प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासून नेते म्हणून ओळखले जातात. जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

 मात्र आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याने पक्षाला धक्का मानला जातो. जगन्नाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने