Oral Health : रोज 'ही' एक गोष्ट करा, गंभीर आजारांपासून वाचा

 


ब्युरो टीम : तोंडाची स्वच्छता हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामध्ये जीभ, दात आणि तोंडातील घाण काढून टाकली जाते. डॉक्टरांच्या मते, सकाळची दिनचर्या तुम्हाला काही गंभीर आजारांपासून वाचवू शकते. त्यामुळे सकाळी तोंड स्वच्छ करणे आणि त्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, ओरल केअर रुटीनला प्राधान्य द्यावे. नियमित ओरल केअर चेकअप करण्यासाठी डेंटिस्ट ला भेट द्यावी. तसेच तोंडाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी दिवसातून दोनदा 2 मिनिटे ब्रश करा. तसेच दर 3 महिन्यांनी ब्रश बदला, कारण तो खराब होतो. दात स्वच्छ करण्यासाठी, फ्लॉसिंग करणे आवश्यक आहे. 

काय आहे फ्लॉसिंग?

फ्लॉसिंग ही दात खोलवर स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे. जेवण करताना, एखादा पदार्थ खाताना दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात. त्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात. दातांमध्ये अडकलेली घाण आणि अन्न काढून टाकण्यासाठी, दात पातळ धाग्याने स्वच्छ केले जातात, या पद्धतीला फ्लॉसिंग म्हणतात. स्मृतिभ्रंश, हृदयरोग आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होणे या समस्या कमी करण्यासोबतच प्रजनन क्षमता वाढण्यास फ्लॉसिंगमुळे मदत होते. 2019 च्या संशोधनानुसार, तोंडात असलेले बॅक्टेरिया तोंडात आणखी हानिकारक बॅक्टेरीया तयार होतात, जे मेंदूपर्यंत जाऊ शकतात, ज्यामुळे 'स्मृतीभ्रंश' होऊ शकतो. तर, हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी तोंडाचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक असल्याचे हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने