Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानी माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन



ब्युरो टीम : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. पाकिस्तान मीडियाने हे वृत्त दिले आहे. १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तसेच त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केले होते. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते. दुबईमधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते दुबईमधील रुग्णालयात ते उपचार घेत होते.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. आपले आत्मचरित्र 'इन द लाइन ऑफ फायर' यामध्ये त्यांनी या युद्धाबाबत लिहिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने