Play Swing : झोका एक, फायदे अनेक!



ब्युरो टीम : झोका खेळण्याची आवड अनेकांना असते.  अनेकजण आपल्या घरामध्ये झोका बांधतात. तर, उद्यानात किंवा यात्रेत सुद्धा झोका खेळण्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.  पण तुम्हाला माहिती आहे का, झोका खेळल्यामुळे फक्त आनंदच मिळत नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने ही त्याचे  चांगले फायदे मिळतात. हे फायदे नेमके कोणते आहेत, त्याची माहिती आज आह्मी तुह्माला देणार आहोत.

स्नायू सक्रिय होतात

आपले स्नायू सक्रिय ठेवण्यास झोका खेळल्यामुळे खूप फायदा होतो. झोका खेळताना आपले शरीर हे मागे-पुढे जात असते.  त्यावेळी  शरीराचे सर्व भाग आणि स्नायू सक्रिय  असतात.

एकाग्रता वाढते

झोका खेळताना मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. संतुलन कसे राखावे, हे देखील मुले शिकतात. झोका खेळल्यामुळे मुलांची मान मजबूत होते.

आत्मविश्वास वाढण्यास मदत

आपल्या शरीराच्या सांध्यांमध्ये रिसेप्टर्स असतात. जेव्हा ते सक्रिय होतात, तेव्हा ते शरीराला सिग्नल देण्यास सुरुवात करतात. झोका खेळताना आपण पायांच्या हालचालीने झोका पुढे-मागे करीत असतो. त्यावेळी शरीर हे सांध्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करू लागते. या प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

शरीराचा व्यायाम

झोका खेळताना शरीराचा व्यायाम  होतो. कारण झोका खेळताना आपण पुढे आणि मागे जात असतो. या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

ताण कमी होण्यास मदत

झोका खेळल्यामुळे तणाव कमी होतो, आणि मनामध्ये आनंदाची भावना तयार होते. उदास असताना झोका खेळल्यास आपली उदासीनता कमी होण्यास मदत होते, तसेच आपल्याला आलेल्या तणावाची पातळी कमी होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने