ब्युरो टीम: - आज पासून सुरु आलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांवरील वाढते हल्ले व पत्रकारांचे अनेक प्रलंबित प्रश्न यासह विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट घेतली. तसेच कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची देखील भेट घेतली. यावेळी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल विधिमंडळात आवाज उठविण्याची विनंती देखील केली.
मागुल आठवड्यात कणेरी मठ येथे वार्तांकन करण्यसाठी गेलेल्या पत्रकारास तसेच मागील
महिन्यात राजापुर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या झालेल्या निर्घृण हत्येसह
यापूर्वी गेल्या 25 ते 30 वर्षात 21 पत्रकारांना निर्दयपणे संपविण्यात
आले. या अनेक घटनांमध्ये आरोपींचा पत्ता नाही,
शिक्षा
झाल्याचेही दिसून येत नाही. शशिकांत वारीशे हत्याप्रकरण आणि पत्रकारांवरील हल्ले याबाबत
चर्चा करून काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव
दीपक कैतके आणि मुंबई अध्यक्ष राज आदाटे हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा