Pune : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन


ब्युरो टीम : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय ८९) यांचं आज, शुक्रवारी पु्ण्यात निधन झालं.  आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

देवीसिंह शेखावत हे १९८५ मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. ते १९९१ मध्ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. १९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. ७ जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील हे विवाहबद्ध झाले होते. अनेक दशके ते अमरावतीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने