Raj Thackeray : धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे, राज ठाकरेंनी टायमिंग साधल



ब्युरो टीम : निवडणूक आयोगाने निकाल देत  शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टायमिंग साधत मार्मिक प्रतिक्रिया दिलीय.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केला आहे. काहीही झालं तरी नाव सांभाळायचं असतं असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत म्हणत आहेत. हाच व्हिडिओ राज ठाकरेंनी ट्विट केला आहे.



व्हिडीओ मध्ये नेमकं काय?

'नाव आणि पैसा.. पैसा येतो पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारातही मिळायचं नाही. त्यामुळे नावाला जपा, नाव मोठं करा' हे वाक्य व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात ऐकू येतं. त्यानंतर या ट्विटच्या वर राज ठाकरेंनी लिहिलं आहे की बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं…. #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy हे लिहिलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने