ब्युरो टीम: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ‘महाराष्ट्र केसरी
बैलगाडी शर्यत’ (पर्व २ रे) कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली.
कर्जत-जामखेडकरांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. सायंकाळी शरद पवार यांच्या
उपस्थितीमुळं या स्पर्धेचा उत्साह द्विगुणीत झाला.अनुजा नितीन शेवाळे (हडपसर)
यांच्या बैलगाडीने स्पर्धेची सीमारेषा पार करताच संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला.
राज्याच्या विविध भागातील तब्बल
२६४ बैलगाडी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दिवसभर भिर्रर्रर्र…. धावणाऱ्या
बैलगाड्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवलं तर ही स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या
कर्जत-जामखेडकरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांनाही प्रोत्साहन मिळालं.
अनुजा नितीन शेवाळे (हडपसर)
यांच्या बैलगाडीने स्पर्धेची सीमारेषा पार करताच संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला.
याच जल्लोषात त्यांना ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडी’चं मानाचं पारितोषिक देण्यात आलं.
तर राजूशेठ मासाळ (लोणंद) यांच्या बैलगाडीने द्वितीय पारितोषिक पटकावलं.
टिप्पणी पोस्ट करा