Rohit Pawar : निलेश लंके यांच्यानंतर आता रोहित पवार, अजितदादांबद्दल म्हणाले....


ब्युरो टीम : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे विधान एका जाहीर सभेत केले आहे. निलेश लंके यांच्या या विधानानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. लंके यांनी केलेले विधान ताजे असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आहे, असे विधान केले आहे.

'आपली एखाद्या पक्षाची युती असेल आणी कोणाला मुख्यमंत्रीपदासाठी नेता निवडायचा असेल तर आपल्यासोबत असलेल्या पक्षांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. मला व्यक्तिगत विचारलं तर अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आहे. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. या पदासाठी अनेक नेते आहेत. मात्र मी अजित पवार यांना खूप जवळून पाहिलेले आहे. सर्व पक्षांनी तसेच आमच्या पक्षप्रमुखांनी ठरवले तर अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि ताकद आहे,' असे रोहित पवार म्हणाले.

तर, दुसरीकडे निलेश लंके यांनी आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असे जाहीर विधान काही दिवसांपूर्वी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागवे, असे आवाहनही  केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने