ब्युरो टीम: राज्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सुप्रीम
कोर्टात राज्यातील सत्तसंघर्षाबाबत मोठी सुनावणी सुरू आहे. अशातच मोठे विधान करत
त्यांनी त्यांच्या व्यक्तव्यातून थेट राजकीय भूकंपाचा इशारा दिला असल्याने, राज्यातील
राजकारण जरा जास्तच तापले आहे. असतांना आमदार रोहित पवार यांनी ते नेमके कक्षा
बद्दल बोलत असतील या बाबत चर्चांना उधाण आले आहे.
आमदार रोहित पवार यांनी
ट्विट करत या राजकीय भूकंपा विषयी वक्तव्य केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले
आहे की, जेव्हा भूंकप येणार असतो तेव्हा पक्षांचं वर्तन बदलत असतं.
ही एक प्रकारे भूकंपाची पूर्वसूचना असते. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांची
कामानिमित्त काल भेट झाली आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या
चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती.. सत्ताधारी असूनही काही
आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून
विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं, असे ट्विट रोहित
पवार यांनी केले असून ते नेमके कोणत्या भूकंपा बाबाबत बोलत आहेत, याबद्दल सध्या
तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रोहित पवार यांनी पुढे
म्हटले आहे की, सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता
येत नसल्याचं समजलं.. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत
असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं… ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?' असा प्रश्न देखील
त्यांनी उपस्थित केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा