ब्युरो टीम : व्हॅलेंटाईन वीक आजपासून सुरू झाला आहे. रोझ डे पासून या वीकची सुरुवात होते. प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाबाचे फुल. यासोबतच गुलाबाच्या फुलांना कोमलता आणि सुंदरतेचे प्रतीक मानले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हनिमूनच्या दिवशी नव जोडप्याची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते ? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.
गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फुल देणे हा सर्वात सोपा पर्याय समजला जातो. या फुलाचे इतरही फायदे असून आजही लग्नाची सजावट असेल किंवा हनिमूनसाठी बेडरुम सजवायचे असेल, ही सजावट गुलाबाच्या फुलांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नसमारंभात (wedding) मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांचा वापर करून सजावट केलेली असते. इतकंच नाही तर हनिमूनच्या दिवशीही नवरा-नवरीची बेडरुम गुलाबाच्या फुलांनी सजवली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुगंधाचा व्यक्तीच्या मूडशी खूप संबंध आहे. गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याशिवायही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे गुलाबाची सजावट केली जाते. चला तर मग आज व्हॅलेंटाईन वीकच्या सुरुवातीला याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मूड चांगला होतो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुलाब जल हे अँटी-डिप्रेसंट मानले जाते. 2011 च्या एका अभ्यासात असे दिसून आले की, गुलाबाच्या पानांमुळे उंदरांची सेंट्रल नर्वस सिस्टम रिलॅक्स होते. यामुळे तणावही कमी होतो. म्हणजेच तुमचा मूड चांगला नसेल, तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तर अशावेळी तुम्ही गुलाबाच्या फुलाचा वास घेऊ शकता. यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल. याशिवाय गुलाबाचा वापरही विविध प्रकारे केला जातो. ब्युटी प्रोडक्ट म्हणून गुलाब जल फार पूर्वीपासून वापरले जात आहे. चंदनाच्या मास्क मध्ये गुलाब जल टाकल्याने त्वचेवरील सनबर्न बरे होण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार गुलाब हे नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्याची पाने शरीरातील दोष दूर करतात. यामुळे व्यक्तीला सेक्शुअली अॅक्टिव्ह देखील वाटते. आयुर्वेदामध्ये सेक्स लाइफ सुधारण्यासाठी गुलाबाची पाने धुऊन खाण्याचा सल्ला दिला जातो. गुलाबाच्या फुलांच्या वासाचा परिणाम सुद्धा तुमच्या मेंदूवर होतो, व त्यामुळे तुमचा मूड सुधारतो.
टिप्पणी पोस्ट करा