Rss:संघाचे लोक व्हॉट्‌सऍपवर न बोलता प्रत्यक्षात भेटतात "आरएसएस'ची नोंदणीच नाही' - सुषमा अंधारे



ब्युरो टीमभारतातील सर्वात मोठी संघटना आरएसएस' आहे. पण त्यांची नोंदणी नाही. देशात ही संघटना काम करते. संघाचे लोक व्हॉट्‌सऍपवर न बोलता प्रत्यक्षात भेटतात, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. बारामतीमध्ये हिंदू कोल्हाटी समाजाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला सुषमा आंधारे यांनी हजेरी लावली. मेळाव्याला राज्यभरातून कोल्हाटी समाजातील बांधव आले होते. यावेळी अंधारे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यांचा झेंडा एक असतो, त्यांचा अजेंडा एक असतो. ज्यांचा झेंडाच नसेल, त्यांचा अजेंडा कसा तयार होईल, हा एक साधा प्रश्‍न आहे. अर्थात तो झेंडा काय असावा, कसा असावा हे कोणी एकाने ठरविण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येवून ठरविणे केव्हाही चांगले. पण होते काय, लोकशाहीमध्ये जेव्हा सगळी माणसं एकत्र येतात. तेव्हा लोकशाहीचे जसे फायदे आहेत, तसे कधी कधी नुकसानही होते.

कारभारी सतरा आणि वेड्याची जत्रा अशी स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, व्हाटसऍप युनिव्हर्सिटीने देशाचे वाटोळे केले. जंगलात धावणारा मुलगा हा ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्यापेक्षा जास्त धावतो. पण ऑलिम्पिकवाला जिंकतो कारण जंगलात धावणाऱ्याला कुठे धावायचे, हे कळत नाही. कोल्हाटी समाज हा एसटी प्रवर्गात गेला नाही, त्याचे कारण कुठे धावायचे हेच कळले नाही, असे त्या म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने