Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंनी काँग्रेसवर डागली तोफ, कारण ही तसेच



ब्युरो टीम : 'बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे घराण्याला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून मला नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळून दिली नाही, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. या सगळ्या कारस्थानाची स्क्रिप्ट अगोदरच लिहण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म हवा होता, म्हणून मी नागपूरला नाना पटोले यांच्याकडे एक माणूस पाठवला होता. मात्र, नाना पटोले यांनी या माणसाला १० तास बसवून ठेवले आणि त्यानंतर त्याच्याकडे चुकीचे एबी फॉर्म दिले. यानंतर प्रदेश कार्यालयाकडून फक्त सुधीर तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म पाठवण्यात आला. मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्या कुटुंबियांविरोधात भाजपशी संधान बांधल्याचे खोटे आरोप करण्यात आले, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीबाबत काँग्रेसमधील प्रदेश कार्यालयातील नेत्यांनी हेतुपरस्सर गोंधळ घालून मला कशाप्रकारे उमेदवारी मिळवून दिली नाही, याबाबत सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे आपली बाजू मांडली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने