ब्युरो टीम: ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी… घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी…’, असे ट्विट विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंनी केली होती. त्यामुळे तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण आता तांबे यांनीच या ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे.
काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली. आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत, त्यामुळे अपक्षच राहणार. तसेच मी अजून काँग्रेस पक्ष सोडला नाही, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
नजरेत सदा नवी दिशा असावी ।

घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023

पण सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच केलेल्या एका ट्वीटमुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. पण यावर आता सत्यजीत तांबे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. आपण एका शाळेला भेट दिली असता, तेथील एका विद्यार्थ्याने कविता म्हटली होती. तिच चारोळी आपण ट्वीट केली, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा