Satyjit Tambe: पक्ष नेतृत्वाचे नाव न घेता सत्यजित तांबे यांची नाना पटोलेवर टीका







 ब्युरो टीम: नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले  काँग्रेसचे निलंबित नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक येथे आज आपली भूमिका स्पष्ट केली.  

      मी सुरवातीपासून पक्षाकडे पक्ष किंवा काहीतरी जबाबदारी मागितली मात्र प्रभारी एच.के. पाटील यांनी वडिलांच्या जागेवर प्रयत्न करण्याचे  सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माझ्या वडिलांनी माघार घेण्याचे ठरवले त्यानुसारच मी अर्ज भरणायचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडून दोन ए बी फॉर्म चुकीचे पाठविण्यात अलायचं गौप्यस्फोट सत्यजित तांबे यांनी केलं आहे. बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले असे आरोप देखील नाव न  घेता सत्यजित तांबे यांनी केले आहे.

      यावेळी काँग्रेसच्या प्रदेशच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत  या विषयावर हि माझी शेवटची पत्रकार परिषद असेल आता मला राज्यातील  युवकांचे प्रश्न , जुन्या पेन्शनचा प्रश्न मांडायचे आहेत. मला माझ्या पक्षाला आणखी बदनाम करायचं नसल्याचे म्हणत मी अजूनही  काँग्रेस पक्षातच असून भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

      दरम्यान निवडणुकीत आपल्याला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केल्याचं ते म्हणाले. तसेच मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याच षडयंत्र रचल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे स्पष्ट केलं नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने