satyjittambe :सत्यजित तांबेचा शपथविधी,विजयामागे राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याची चर्चा कारणही तसेच.... घोषणा झाली.. एकच वादा… अजित दादा!

 



ब्युरो टीम: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विजयी आमदार सत्यजित तांबे यांच्या शपथविधीवेळी सभागृहाततून एकच वाद अजित दादा च्या घोषणा सुरु झाल्याने सभागृहातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या सत्यजित तांबे आणि भाजपा मध्ये जवळीक वाढल्याची चर्चा असताना ताम्बेन्च्या विजयात राष्ट्रावादिनेदेखील जोर लावल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सत्यजित यांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या नावाच्या घोषणाबाजूने नव्या चर्चांना उधाण आलंय.

विधान परिषदेत आज सत्यजित तांबे हे शपथविधीसाठी पुढे आले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच वादा सत्यजित दादा.. अशी घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहातील इतर कार्यकर्त्यांनी एकच वादा… अजित दादा अशी घोषणाबाजी केली. या दोन्ही घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसने तिकिट दिलेले त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय़ घेतला.तांबेंच्या कॉंग्रेस विरोधात उचललेल्या पावलामागे कोण आहे याचे आखाडे बांधताना सुरुवातीला भाजप, देवेंद्र फडणवीस, असल्याचे म्हटले जात होते. म्हणून नाशिक पदवीधर मधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असे म्हटले जात होते.

त्यवेळी सत्यजित भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. भाजपनेही त्यांना ऑफर दिली नाही. तांबे भाजपकडे मदतीला गेले नाहीत मात्र निवडणूक निकालानंतर त्यांनी नाना पटोले वर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांचे मामा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळसाहेब थोरात यांनी देखील पटोले विरोधी भूमिका घेतली. नाशिक पदाविधr मध्ये राजकारण झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

त्यानंतर अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले सत्यजित तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी द्यायला हवी होती. पण तसे गह्डले नाही. अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली. तांबे महाविकास आघाडीचे उमेदवार नसताना त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यटन केल्याचे म्हंटले जात आहे. त्यानंतर आता शपथविधीवेळी अजित पवारांच्या नावाच्या घोषणा झाल्या यावरून ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती अशी चर्चा नव्याने सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने