sharad pawar udhhav thakare: शरद पवारांना फोन करत उद्धव ठाकरेंनी ठरवली पुढील वाटचाल ?

 



ब्यूरो टीम: सत्तासंघर्षाच्या दरम्यान निवडणुक आयोगाने काल शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री झोरदार झटका बसला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ठाकरे गट या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अश्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालासंदर्भात चर्चा झाली असून त्यांनी कायदेशीर बाबींवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना आश्वत करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी चर्चा केली आहे.

या चर्चेतील कायदेशीर बाबी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाणून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे जिल्ह्याप्रमुखांना काय आदेश देणा, हे पाहावे लागेल. तसेच उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने