sharad pawar : पवार 'पॉवर'! मोदींकडून पवारांचं पुन्हा कौतुक



ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकारण सहजासहजी कळत नाही, असं म्हटलं जातं. पवार बोलतात एक आणि करता एक, असं तर राजकीय नेत्यांकडून नेहमीच सांगितलं जातं. अनेकदा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या निशाणावर शरद पवार असतात. मात्र आता देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी थेट संसदेमध्येच शरद पवार यांचे कौतुक केलं असून यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली.

‘मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो’ असं विधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शरद पवार हे सभागृहाचे वरिष्ठ नेते असून मी त्यांना नेहमी आदरणीय मानतो, असं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. ते राज्यसभेत बोलत होते.  तसेच काँग्रेसने १९८० साली शरद पवारांचं सरकार पाडलं, अशी टीकाही त्यांनी केली.

शरद पवारांना उद्देशून मोदी म्हणाले, 'या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य तिथे मागे बसले आहेत. मी त्यांना नेहमी एक आदरणीय नेता मानतो, त्यांचं नाव श्रीमान शरद पवार… १९८० मध्ये शरद पवारांचं वय ३५ ते ४० वर्षे होतं. एक नवखा मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करायला निघाला होता. पण त्यांच्या सरकारला काँग्रेसने पाडलं. आज तेही काँग्रेसच्या बाजुने आहेत. प्रत्येक प्रादेशिक नेत्यांना काँग्रेसने त्रास दिला आहे. एनटीआर यांच्यासोबत काय झालं? ते जेव्हा उपचारासाठी अमेरिकेत गेले, त्याचवेळी काँग्रेसने एनटीआरचं सरकार पाडलं, ही काँग्रेसची राजनीती आहे,' अशी जोरदार टीका नरेंद्र मोदींनी केली.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर स्तुतीसुमनं उदयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने