sharad pawar: शरद पवार हे ओसाड गावचे पाटील, संजय राऊत टाइम पास चॅनल;सोलापुरात माजी मंत्र्याची टीका

 



ब्युरो टीम: शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानी यांचं कौतुक केलंय, यावरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शऱद पवार हे ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फार अर्थ नाही. लक्ष देऊ नका, अशी खिल्ली माजी कृषी राज्यमंत्र्याने उडवली आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत  यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत हे टाइम पास चॅनल आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत ही धारदार टीका केली. तर सात महिने उलटूनही राज्याचा संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, यावरही त्यांनी अजब भाष्य केलंय. अजित पवार हेच यासाठी कारण असल्याचं ते म्हणालेत.

शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानी यांचं कौतुक केलंय यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालंय. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात, बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे.

संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. सदाभाऊ खोत म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल…

 

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने