sharad pawar: पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणाले..मला देवेंद्र फडणवीसांनचे महत्व वाढवायचे नाही.



ब्युरो टीम: पहाटेच्या शपथविधीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटा नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुसंकृत नेत्याने असे खोटे बोलणे बरोबर नाही. शिवाय सुप्रिया सुळे यांनी देखील फडणवीसानांवर टीका केली होती. मात्र अजित पवार मात्र्र या विषयावर काहीच बोलतना दिसत नाहीत.  आज पुन्हा पुण्यात शरद पवारांना पहाटेच्या शपथविधी बद्दल विचारले असता शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.  

शरद पवारांशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधी केला, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याबाबत आज पत्रकारांनी विचारताच, मी काहीच बोलणार नाही, मला फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांना फटकारले.

 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने