ब्युरो टीम : पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केलं आहे. फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवारांना विचारलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं.'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांबरोबर २०१९ साली ७२ तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापन झालं होतं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
'उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,' असं वक्तव्य ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा