Shiv Sena Party:धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला समोर या; एकनाथ शिंदेंना ठाकरेंचं खुलं आव्हान



ब्युरो टीम: मातोश्रीबाहेर ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं..आज महाशिवरात्र आहे. शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहे. मी या चोरांना आव्हान देतोय, तुम्ही धनुष्य बाण चोरला आहे, तो धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला समोर या, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

उद्धव ठाकरेंचं आज मातोश्रीबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मातोश्रीबाहेर जात कलानगर सर्कलजवळ खुल्या कारमधून भाषण करत ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवश शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. आता तेच शिवधनुष्य घेऊन निवडणुकाला सामोरे जा, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हुंकारही उद्धव ठाकरे यांनी भरला.

शुक्रवारी रात्री निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आण भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. आजही त्यांनी मातोश्रीबाहेर येत एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं.

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा अंतिम निकाल तर लागला. पण तरीही ठाकरेंसाठी संघर्ष अजून संपलेला नाहीय. कारण नव्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का याबाबतचे प्रश्न कायम आहेत.  तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण तर ठाकरेंकडून हिरावलं गेलं. चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेना मिळाला. पण आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाही. ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे.  चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरतं होतं. काल दिलेल्या निकालात आयोगानं स्पष्ट म्हटलं आहे की हे तात्पुरतं नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्यानं प्रक्रिया करावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने