shivsena- bjp : महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण? आदित्य ठाकरे व देवेंद्र फडणवीस झाले मित्र



ब्युरो टीम: भाजपासोबतची युती तोडून उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीच्या नावाने सरकार स्थापन केले. तेव्हापासून ठाकरे- फडणवीस यांच्या मध्ये संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षामुळे शिवसेनेत फुट पडली व ठाकरेंच सरकार पडले.

त्यानंतर फडणवीस व ठाकरे मध्ये वारंवार आरोप -प्रत्यारोप होत आहेत. हे सगळे घडत असले तरी मी त्यांचा शत्रू नसून मित्र आहे आम्ही फक्त वैचारिक विरोधक आहोत असे फडणवीस म्हणाले या आवाहनाला ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय.. आदित्य ठाकरेंना फडणवीसांसंदर्भात विचारणा केली असताना, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना मित्र मानत असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलं.

 

राजकारणात वैचारीक विरोध असतो, उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालोय, कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाने आता टोक गाठलं आहे. रोजच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चढत असतानाच राज्याच्या राजकारणात नवे ट्विस्ट येत आहेत. त्यातच आता फडणवीस आणि ठाकरेंकडून आलेली ही वक्तव्य भविष्यातल्या नव्या धक्कातंत्राची नांदी तर नाही ना? याबाबत मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने