ब्युरो टीम: निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे गटाला बसलेल्या राजकीय झटक्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला होणार आहे. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीने ठाकरे – शिंदे गटाच्या गोंधळात नवीन मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यापुढील काळात महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला मान मिळणार आहे.
शिवसेना फुटीपूर्वी महाविकास आघाडीत सर्वात
मोठा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेकडे पहिले जात होते. मात्र शिवसेना फुटीचा फायदा
काही न करता राष्ट्रवादीला झाला असून पक्षानेही नवीन मतदारांना आकर्षित करण्याचे
जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
मुळात आठ महिन्यापूर्वीच शिवसेनेत फुट पडल्यापासून राष्ट्रवादीने आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र मागील आठवड्यात निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह व शिवसेना हा पक्षच शिंदे गटाला दिल्याने काही न करताराज्यात भाजपानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचे आकड्यांवरून दिसत आहे
शिवसेना
पक्षात फूट पडल्यानंतर पक्षात उद्धव ठाकरे गटाचा मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचे
दिसून येते तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्यात एक नंबरचा पक्ष होण्यासाठी
अनेक राजकीय डावपेच आखण्यात सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी
कॉंग्रेस यापूर्वीही बळकट होती; मात्र
पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी आणखीन वाव मिळाला आहे. सध्याचे राजकीय बलाबल पाहिले
तर शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मुख्य राजकीय पक्ष
झाला आहे
तर त्या
नंतर एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि त्यानंतर कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे गट, अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड
केल्यानंतर महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडणे भाग पडले. शिवसेना फुटीनंतर
आमदार संख्या घटल्यामुळे सत्तेवरून महाविकास आघाडी पायउतार होताच विरोधी
पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वर्णी लागली. आता शिवसेना पक्षाचे नाव आणि
चिन्ह ठाकरे गटाला गमवावे लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटना विस्ताराच्या
दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा