ShivSena Symbol : शरद पवारांनी शिंदे गटाला लगावला टोला



ब्युरो टीम : 'निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी हा वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला, लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही,' असे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  पक्षाला 'धनुष्यबाण' चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय. शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी असल्याचं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावर आता  शरद पवार यांनी भाष्य केलंय.

'उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेले चिन्ह लोक मान्य करतील. त्यामुळे धनुष्यबाण गेल्याने फारसा परिणाम होणार नाही. या सगळ्याची पंधरा दिवस ते महिनाभर चर्चा होईल, त्यानंतर सगळं थंड होईल,' असेही शरद पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने