ShivSena Symbol : उद्धव ठाकरेंचे ओपन जीपवरून भाषण, महाराष्ट्राला झाली बाळासाहेबांची आठवण



ब्युरो टीम : आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन जीपवर उभे राहून भाषण केलं. हेच चित्र ३० ऑक्टोबर 1968 साली दिसलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जीपच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. तीच आठवण यावेळी महाराष्ट्राला झाली.

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाने ठाकरेंविरोधात निर्णय दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. तर आयोगाने शिवसेना पक्षाची ताकद शिंदेंच्या पारड्यात टाकल्यानंतर शिंदे गट अधिक आक्रमक झाला आहे. हजारो शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे लढाईसाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे.  पुढील रणनीती काय,  हे ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन जीपवर भाषण केलं. यानिमित्ताने मात्र समस्त महाराष्ट्राला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले...

'धनुष्यबाण चोरणारे मर्द असतील तर तुम्ही धनुष्यबाण घेऊन या.. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील,' असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी करीत विरोधकांवर कडाडून टीका केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने