shivsena symbol : शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभे, विरोधीपक्ष नेते दानवे स्पष्टच बोलले



ब्युरो टीम : 'गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या राजकीय घडामोडीचा सर्वसामान्य शिवसैनिकांवर कोणताही परिणाम झालेला नाही. आजही शिवसैनिक हे उद्धवजी ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत,'  असे स्पष्ट मत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडले.

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते  दानवे आज अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली असतां त्यांचे संभाजी कदम व माजी महापौर सुरेखा कदम यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,'स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडून गेले असले तरी त्याचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नाही. नगरमध्ये शिवसेनेचे चांगले पद्धतीने काम सुरु असून, आजही अनेक लोक शिवसेनेत दाखल होत आहेत. त्याचबरोबर शिवसेना महापौर या ठिकाणी असल्याने विकास कामातून जनतेची सेवा होत आहे. शहरप्रमुख संभाजी कदम यांनी नगर शहरात पक्षाचे मजबूत संघटन केले आहे. शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन केले जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, संदिप दातरंगे, श्रीकांत चेमटे, अभी अष्टेकर, रमेश खेडकर, गौरव ढोणे, गोविंद हांडे आदी उपस्थित होते.

   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने