SHIVSENA: सत्तासंघर्षावर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरे गटाला मोठा धक्का! शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव!

 


 ब्युरो टीम: देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाने सत्ता संघर्षावर महत्वाचा निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताचा आधारावर हा निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे. तर या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने दोन्ही ठाकरे तसेच शिंदे गटाला आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधीकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करण्याचेही निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणणूक आयोगासमोर सादर केले होते.

 

दरम्यान, या निकालानंतर. “लोकशाहीला बहुमताला महत्त्व असते अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. आज आपण पाहिले राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने