ब्युरो टीम: शिवसेनेच्या
सत्ता संघर्षाच्या वातावरणात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह
शिंदे गटाला दिल्याने राज्यात घडमिदिना वेग आला आहे. विधिमंडळातील कार्यालय
ताब्यात घेतल्यानंतर लोकसभेतील पक्ष कार्यालय देखील शिंदे गटाने ताब्यात घेतले
आहे. सोबतच त्यांनी आता पक्षाचे मध्यवर्ती कार्यालायचे ठिकाण देखील बदलले आहे.
नवीन मध्यवर्ती कार्यालय आनंद आश्रम श्री भवानी चौक टेंभी नाका ठाणे या ठिकाणी
हलवले आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गट व शिंदे गटाचा पक्षाच्या
अधिकाराचा निकाल देताना शिंदे गटाच्या बाजूने देताच शिंदे गटाने आपले वर्चस्व
दाखविण्यास सुरुवात केली आहे. सोबतच
यापुढे आम्हाला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणावं असे पत्र देखील सर्व समाज
माध्यमांना दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा