shivsena: संसदेच्या शिवसेना कार्यालयात आले नवीन चेहरे: बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ‘या’ चेहऱ्याला मिळाला मान



ब्युरो टीम: निवडणूक आयोगाने  शिवसेना पक्ष व चिन्हा बाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय देखील शिंदे गटाच्या ताब्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी या कार्यालयात चित्र बदलण्यास सुरुवात केली आहे.

संसदेच्या परिसरात असलेल्या शिवसेना कार्यालयात  शिंदे गटाच्या शिवसेनेने कार्यालय ताब्यात आल्यानंतर कार्यालयात लावेल्ले काही चिते बदलली आहेत. आता शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे व नंतर आदित्य ठाकरेंचे फोटो होते. ते हटवत आता बाळासाहेब ठाकरेनंतर उध्दव ठाकरेच्या जागी आनंद दिघे तर आदित्य ठाकरेंच्या जागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेते पदी निवड करण्यात आली आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने